वर्धेत सौंदर्यीकरणाचे विद्रृपीकरण; पाण्याअभावी झाडे करपली

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
Beautification in Wardha सन १९३० मध्ये महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात ऐतिहासिक मिठाचा सत्याग्रह करण्यात आला. त्याचे स्मरण रहावे यासाठी वर्धा रेल्वे स्थानकाच्या परिसरात महात्मा गांधी व त्यांच्या सहकार्यांचे एक आकर्षक शिल्प लावण्यात आले. शिवाय त्या ठिकाणी विविध झाडं लावून सौंदर्यीकरण करण्यात आले. पण, ती झाडं आता करपली आहे. त्यामुळे ते सौंदर्यीकरण आता विद्रृपीकरणात बदलेले आहे.
 
 
warddsds
 
सेवाग्राम येथील आश्रमातून महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्याला दिशा दिल्याने वर्धा हे स्वातंत्र्य लढ्याचे केंद्र राहिले. सेवाग्राम येथील गांधी आश्रमात देश-विदेशातील पर्यटक भेट देतात. सेवाग्राम विकास आराखड्याच्या माध्यमातून शासनाचा मोठा निधी खर्च करून वर्धा शहर, सेवाग्राम परिसरात विविध विकास कामं करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून काही ठिकाणी सौंदर्यीकरणाची कामंही झाली. शिवाय काही ठिकाणी विविध प्रजातींची रोपटे लावून परिसर हरित करण्यात आला. असेच सौंदर्यीकरण वर्धा रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले. पण वर्धा रेल्वे स्थानक परिसरातील विविध प्रजातींची झाडे पाण्याअभावी पूर्णत: करपल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ही वाळलेली झाडे आता विद्रृपीकरणात भर टाकत आहे.
 
 
रेल्वे स्थानक परिसरात सौंदर्यीकरणादरम्यान लावण्यात आलेले हे शिल्प भारताच्या विविधतेतील एकता आणि ब्रिटीश राजवटीविरुद्ध अहिंसक संघर्षाचे प्रतिक मानले जाते. पण याच शिल्पाच्या शेजारील झाडे पाण्याअभावी पूर्वत: करपले असल्याने विद्रृपीकरणात भर पडत आहे.