वर्धा,
जीवनातील आपत्ती टाळण्यासाठी सकारात्मकता, शांती थाणि ध्यानधारणा आवश्यक आहे. आपत्ती वाढण्याचे सर्वात मोठे कारण सत्तेची लालसा होय. सत्तेची ही लालसा आज जगात युद्धासारखी परिस्थिती निर्माण करत आहे. मानसिक प्रदूषण हे पर्यावरण प्रदूषण व नैसर्गिक आपत्तींचे मुख्य कारण असल्याचे मार्गदर्शन ब्रह्मकुमार Bharat Bhushan भरत भूषण यांनी केले. ते प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या शास्त्रज्ञ, अभियंते आणि वास्तुविशारद विभागाच्या मोहिमेंतर्गत बुधवार १० रोजी सायंकाळी ६:३० वाजता स्थानिक ब्रह्मकुमारी विद्यालयात पर्यावरण संरक्षण आणि आपत्ती व्यवस्थापनात कार्यक्रमात बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून डॉ. के. टी. व्ही. रेड्डी, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, माऊंट अबू येथील बी. के. भरत भूषण, अनुराग, संगीता, दिव्यानी, माधुरी दीदी, मधू दीदी आदी उपस्थित होते.
यावेळी मोहन सिंघल म्हणाले, मन शुद्ध असेल तर ते गंगेसारखे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मन स्थिर ठेवणे हीच गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. डॉ. के. टी. व्ही. रेड्डी म्हणाले की, आपले लक्ष नेहमी स्वतःवर असले पाहिजे आणि झाडे लावण्यासारखे कोणतेही चांगले काम आपण स्वतःच सुरू केले पाहिजे. नगराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी जर आपण स्वतःमध्ये परिवर्तन घडवले तरच आपण जगात परिवर्तन घडवू शकतो असे सांगितले. तृप्ती दीदी यांनी संचालन केले तर रेणू दीदी यांनी आभार मानले.
Bharat Bhushan या अभियानांतर्गत, पिपरी मेघे येथील बजाज इंजिनीअरिंग कॉलेजमध्येही अशाच प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात कॉलेजचे डीन डॉ. रेड्डी आणि भरत भूषण उपस्थित होते. भरत भूषण भाई यांनी मुलांना पर्यावरण स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व सांगितले. सावंगी येथील दत्ता मेघे इंजिनीअरिंग कॉलेज, वर्धा येथील जे.एस.एम. अकादमी, भुगाव येथील अवोनीथ स्टील इंडस्ट्री, देवळी येथील महालक्ष्मी इंडस्ट्री आणि बोरगाव येथील कोचिंग अकादमी येथेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.