Bori Chatari Retighat पैनगंगा पात्रातील हर्रास न झालेल्या बोरी चातारी रेतीघाटावर रेती हंगाम 2026 मध्ये मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन झाल्याने पावसाळा सुरू होण्यापूर्वी विद्रुप झालेल्या नदीपात्राची पाहणी करण्याची मागणी तक्रारकर्त्याने केल्यानंतर रेतीघाटांची मुदत संपल्यावर अखेर जिल्हा खनिकर्म कार्यालयाचे भौगोलिक माहिती प्रणाली सहायक धनाजी जाधव यांनी आपल्या पथकासह शुक्रवार, 12 जून रोजी भल्या पहाटे संबंधित कार्यकर्ते व तलाठ्यासोबत बोरी चातारी रेतीघाटावर पोहचून रेतीघाटांची पाहणी केली.
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाèया पैनगंगा नदीपात्रात बोरी चातारी हद्दीत स्थानिक अधिकाèयांच्या सहमतीने मोठ्या प्रमाणात उत्खनन करून लाखो रुपयांची रेती तस्करी होत असल्याच्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या तक्रारी मागील 3 ते 4 महिन्यांपासून महसूल प्रशासनाकडे सुरूच आहेत. परंतु स्थानिक महसूल प्रशासनाने तक्रारींना जुमानले नाही. 30 मार्च रोजी एलसीबीकडून चातारी रेतीघाटात उत्खनन करणाèयांविरुद्ध कारवाही करण्याचा प्रयत्न झाला असताना राजकीय हस्तक्षेपामुळे हा रेतीघाट चांगलाच गाजला होता. तेव्हापासून महसूल प्रशासनाच्या अखत्यारित पोलिसांचा हस्तक्षेप झाला नाही.
Bori Chatari Retighat त्यानंतर महसूल कर्मचारी, अधिकारी व रेती माफिया यांच्या ‘समन्वया’तून रेती तस्करी सुरू झाली. रेती उत्खननाच्या तक्रारी वाढत असल्यातरी या रेतीघाटावर रेती तस्करांचा संचार होता. कारवाई करण्यास कोणताही अधिकारी धजावत नव्हता. अशा तèहेने 10 जून रोजी रेतीघाटांची मुदत संपली. ‘आता नदीपात्रात पाणी यावे आणि त्याबरोबर खड्डे झाकून जावेत’, अशी प्रार्थना तस्कर व स्थानिक महावसूलकर्ते करीत होते. दरम्यान गुरुवार, 11 जून रोजी ईसापूर धरण वितरिकेच्या माध्यमातून पाणी नदीपात्रात सोडण्यात आले. परंतु बचाव झाला नाही. बोरी रेतीघाट भागात पाणी पोहचलेच नाही. त्यामुळे रेती चोरीला गेल्याचे खनिकर्म पथकाच्या लक्षात आले. जिल्हा खनिकर्म पथकामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली सहायक धनाजी जाधव, महसूल सहायक सुरेश ठोंबरे, निलेश भाटबडवे यांच्यासह तलाठी राहुल चव्हाण, बोरीचे पोलिस पाटील प्रदीप माने यांचा समावेश होता. आता जिल्हा खनिकर्म अधिकारी कोणावर कारवाई करतात याकडे पर्यावरण प्रेमींचे लक्ष लागले आहे.