प्रशासन आले लसनपुररात!

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
*जिल्हाधिकार्‍यांचा ग्रामसंवाद
 
वर्धा, 
एक दिवस ग्रामस्थांसोबत या उपक्रमांतर्गत Collector Vanmathi C. जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी समुद्रपूर तालुयातील लसनपूर गावाला भेट दिली. यावेळी आयोजित ग्रामसंवाद कार्यक्रमात त्यांनी गावकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच समस्या तात्काळ निराकरणासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले.
 
 
vandks
 
जिल्हाधिकारी वान्मथी सी. व मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी लसनपूर येथील प्राथमिक शाळा, अंगणवाडी आणि ग्रामपंचायत कार्यालयाला भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. महिला बचत गटाच्या उद्योजक मालाची विक्री करणार्‍या फिरत्या केंद्राला भेट देऊन महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. यावेळी गावातील विविध विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना मिळणार्‍या सेवांचा सविस्तर आढावा घेऊन कामांचा दर्जा राखत ती वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी लसनपूरच्या ग्रामस्थांनी पिण्याचे पाणी, रस्ते, वीजपुरवठा, महसूल विषयक प्रकरणे, शेतीविषयक अडचणी तसेच शासकीय योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींबाबतचे प्रश्न मांडले.
 
 
 
Collector Vanmathi C.  यावेळी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी नागरिकांनी स्थानिक पातळीवर समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिला बचतगटांनी केवळ उत्पादन न करता स्थानिक व व्यापक बाजारपेठेतील मागणीचा अभ्यास करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले. गावातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व दर्जेदारपणे नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्याचे निर्देश यंत्रणेला देण्यात आले. नियमित समुपदेशन व जनजागृती मोहिमा राबवण्याच्या सूचना यावेळी दिल्या. या विशेष ग्रामसंवाद कार्यक्रमाचे औचित्य साधून अंत्योदय अन्न योजनेच्या शिधापत्रिका, आयुष्मान भारत योजनेचे आरोग्य कार्ड, प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजनांतर्गत पूर्ण झालेल्या घरांच्या चाव्या, कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत ट्रॅटर वाटप करण्यात आले.