पीक कर्ज ११०० कोटीचे शेतकर्‍यांनी घेतले २८५ कोटी!

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
प्रत्यक्ष कर्जमाफीची वाट
 
मनोज रायपुरे
वर्धा, 
Crop Loan शेतकर्‍यांना पेरणीत दिलासा म्हणून बँकांकडून पीक कर्ज वाटप केले जाते. घेतलेले कर्ज कधी माफ होते हे शेतकरी पाहत असतात. हा खेळ दरवर्षीचा झालेला आहे. शेतकर्‍यांची कर्जमाफी हा राजकारणातला सर्वात महत्त्वाचा विषय ठरतो. दरम्यान, यावर्षी सरकारने कर्जमाफीची घोषणा केली. पण, प्रत्यक्षात कोणाला माफी याची वाट शेतकरी पाहत आहेत. परिणामी, शेतकरी कर्जासाठी बँकेत पोहोचलाच नाही. त्यामुळे बँकांना ११०० कोटी रुपयांचे उद्दीष्ट दिले असताना शेतकर्‍यांनी २८५ कोटी कर्जाची उचल केली.
 
 
Crop Loan
 
जिल्हा अग्रणी बँकेमार्फत जिल्ह्यात २०२६-२७ मध्ये ११०० कोटींचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट दिले आहे. त्यापैकी खरीप हंगामासाठी ८५० कोटी तर रब्बीसाठी २५० कोटी आहेत. ३१ मेपर्यंत जिल्ह्यातील १९ राष्ट्रीयीकृत बँकांच्या माध्यमातून २८५ कोटींचे पीककर्ज वाटप झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँकेकडून घेतलेले थकीत कर्ज भरून दरवर्षी खरीप हंगामात शेतकरी नव्याने बँकेतून पीककर्ज घेतात. सन २०२६-२७ साठी जिल्ह्यातील विविध बँकांना खरीप व रब्बी हंगामासाठी ११०० कोटींचे पीककर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले. जिल्ह्यात ४.१९ लाख हेटरवर खरीप हंगामाचे नियोजित क्षेत्र आहे. खरीप हंगामात कपाशी, तूर, सोयाबीन ही मुख्य पिके घेण्यात येतात.
 
 
 
Crop Loan  खतं, बियाणे आदी खरेदीच्या अनुषंगाने तसेच हंगामात लागणार्‍या खर्चाकरिता शेतकरी बँकांकडून पीककर्ज घेतात. यंदा राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे. परिणामी, अनेक शेतकर्‍यांनी थकीत पीककर्ज भरले नाही. यामुळे नवीन पीककर्ज घेताना अडचणींना समोर जावे लागत आहेत. खरीप हंगाम तोंडावर आहे. बियाणे, खते घेण्यासाठी शेतकरी पैशांची जुळवाजुळव करीत आहे. कर्जमाफी होईल, अशी शेतकर्‍यांना आशा आहे. पण, या कर्जमाफीत तारखांचा खेळ आहे. २ लाखापर्यंत किती शेतकर्‍यांना कर्जमाफी मिळेल, असा प्रश्न आहे. खरिपातील कर्जाची नियमित फेड झाली असेल तरच बँकांकडून नवे कर्ज देण्याबाबत विचार केला जातो. परिणामी, शेतकरी पीककर्जापासून वंचित राहतात. गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न झाले नाही. त्यात सरकारकडून कर्जमाफीचे आश्वासन दिल्याने कर्जमाफी होईल, या आशेने थकीत पीककर्ज भरले नाही. उलट बँकेचे व्याज वाढले.
बँकनिहाय पीक कर्जवाटप कोटीत
बँंक ऑफ बडोदा :       १२१६.७४
बँक ऑफ इंडिया :      १२०६७.२९
बँक ऑफ महाराष्ट्र :    २५९१.९६
कॅनरा बँक :                 १४९.३०
सेंट्रल बँक :                १३११.६७
इंडियन :                      ७०.७५
इंडियन ओव्हरसिस :     ८१.५२
पंजाब नॅशनल बँक :       ५७५.४०
स्टेट बँक :                    ५९४९.००
यूको बँक :                 ९६.१९
युनियन बँक :              ९४७.५०
अ‍ॅसिस बँक :              २८.४८
एचडीएफसी बँक :       ६८४.०१
आयसीआयसीआय बँक : ४९८
आयडीबीआय बँक :       २६६.०४
महाराष्ट्र बँक :                 १६०६.९०
जिल्हा मध्यवर्ती बँक :       ३८०.१५
इंडसइंड :                       ००
डीसीबी :                          ००