भारतीय खलाशांच्या मृत्यूनंतर इराण संतापला

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
तेहरान,
deaths of Indian sailors ओमानच्या किनाऱ्याजवळ घडलेल्या कथित अमेरिकन हल्ल्यात भारतीय खलाशांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवर इराणने तीव्र दुःख व्यक्त केले. या प्रकरणात अमेरिकेच्या भूमिकेवर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेनंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते आणि सार्वजनिक मुत्सद्देगिरी केंद्राचे प्रमुख इस्माईल बाकाई यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत मृत भारतीय खलाशांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी भारत सरकार आणि भारतीय जनतेला देखील शोकसंदेश दिला.
 
 

इस्माइल बक़ाई 
 
त्याचबरोबर त्यांनी अमेरिकेवर तीव्र टीका करत हे हल्ले “राज्य-प्रायोजित चाचेगिरी” आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन असल्याचे आरोप केले. अशा कारवायांमुळे जागतिक सागरी सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. आंतरराष्ट्रीय समुदायाने अमेरिकेला जबाबदार धरावे, अशी मागणीही त्यांनी केली.मिळालेल्या माहितीनुसार, ओमानच्या किनाऱ्याजवळ एका व्यापारी जहाजावर झालेल्या घटनेत एकूण २४ भारतीय खलाशी होते. त्यापैकी २१ जणांना सुरक्षित वाचवण्यात आले, मात्र तिघे बेपत्ता झाले होते. नंतर शोध मोहिमेत दोन खलाशांचे मृतदेह सापडले असून, मुख्य अभियंता पटनला सुरेश अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा जीवित सापडण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. या घटनेनंतर भारत सरकारनेही तीव्र प्रतिक्रिया दिली असून परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा निषेध नोंदवत अमेरिकेतील राजदूताकडे औपचारिक आक्षेप व्यक्त केला आहे. या प्रकरणामुळे भारत, अमेरिका आणि इराण यांच्यातील राजनैतिक वातावरण अधिक तणावपूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.