श्रीपांडुरंगेश्वर शिव मंदिरात रुद्राभिषेक संपन्न

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Deendayalnagar दीनदयालनगर येथील श्रीपांडुरंगेश्वर शिव मंदिरात कमला एकादशीनिमित्त गुरुवार, ११ जून रोजी सकाळी सामूहिक रुद्राभिषेक व श्रीविष्णुसहस्त्रनाम आवर्तन भक्तिभावाने संपन्न झाले.
 
 
shiv2
 
कार्यक्रमाची सुरुवात शांतीमंत्र, अथर्वशीर्ष, पुरुषसूक्त, श्रीसूक्त पठणाने झाली. त्यानंतर रुद्रावर्तन व रुद्राभिषेक करण्यात आला. पुढे श्रीविष्णुसहस्त्रनामाचे सामूहिक पठण करण्यात आले.Deendayalnagaअधिकमासातील अखेरची एकादशी असल्याने यजमापदाची जबाबदारी . राधा कु-हेकर व दीपाली देशपांडे यांनी सांभाळली. संपूर्ण पूजेचे पौरोहित्य श्री अनंतराव साठे यांनी केले.मंदिर समिती, व्यवस्थापन मंडळ व रुद्रमंडळाचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरती व प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे व्यवस्थापन श्री मुरलीधर कु-हेकर यांनी केले.
सौजन्य सतीश देशपांडे ,संपर्क मित्र