महामेट्रोच्या नावावर सायबर सापळा

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
- बनावट नियुक्तीपत्रे देत बेरोजगारांची फसवणूक

नागपूर, 
Fraud against the unemployed महामेट्रोमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या सायबर टोळ्यांचा धंदा दिवसेंदिवस वाढत असून, या प्रकारामुळे महामेट्रो प्रशासनाचीही डोकेदुखी वाढली आहे. बनावट संकेतस्थळे, सोशल मीडिया पेजेस आणि अगदी महामेट्रोचा अधिकृत लोगो वापरून बनावट नियुक्तीपत्रे तयार केली जात असल्याने या फसवणुकीने गंभीर स्वरूप धारण केले आहे.
 
 
fraud fdsl
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फसवणूक करणारे आता अत्याधुनिक पद्धतींचा वापर करत आहेत. ते अधिकृत भरती पोर्टलप्रमाणे दिसणारी संकेतस्थळे तयार करतात, बनावट सोशल मीडिया खाती चालवतात आणि उमेदवारांशी थेट संपर्क साधून नोकरीची हमी देतात.
या प्रक्रियेत उमेदवारांकडून प्रक्रिया शुल्क, सुरक्षा ठेव किंवा वैयक्तिक माहितीची मागणी केली जाते. काही टोळ्या थेट नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली एक ते दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम उकळतात. तर दुसरा गट ‘सुरक्षा ठेव’ किंवा ‘नोंदणी शुल्क’ म्हणून ५०० ते २ हजार रुपयांची मागणी करतो. रक्कम तुलनेने कमी असल्याने अनेक जण सहजपणे पैसे भरतात आणि फसवणुकीचे बळी ठरतात.
मिळालेल्या माहितीनुसार महामेट्रोला दर आठवड्याला किमान एक-दोन बनावट संकेतस्थळे किंवा सोशल मीडिया पेजेस शोधून बंद करण्याची वेळ प्रशासनावर येत आहे. अशा प्रकारचे डझनभर प्रयत्न दरवर्षी होत असल्याचा अंदाज आहे.
Fraud against the unemployed  अनेक उमेदवारांना आपली फसवणूक झाल्याचे तेव्हाच लक्षात येते, जेव्हा ते नियुक्तीपत्रांची पडताळणी करण्यासाठी महामेट्रोशी संपर्क साधतात किंवा मुलाखतीच्या बोलावण्याबाबत चौकशी करतात. त्यामुळे महामेट्रोने उमेदवारांना केवळ अधिकृत माध्यमांवरील भरती जाहिरातींवर विश्वास ठेवण्याचे आणि कोणालाही पैसे न देण्याचे आवाहन केले आहे.