घरकुलाच्या जागेच्या वादातून दगडाने मारहाण

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
एकाविरुद्ध गुन्हा दाखल
 
मंगरूळनाथ, 
gharkul Plot Issue तालुयातील वनोजा येथे घरकुलाच्या जागेच्या वादातून एका शेतकर्‍याच्या डोयात दगड मारून जखमी केल्याप्रकरणी मंगरूळनाथ पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध ९ जून रोजी गुन्हा दाखल केला आहे.
 
gharkul
 
फिर्यादी दीपक सीताराम वैरागडे (वय ५० ) रा. वनोजा ता. मंगरूळनाथ यांच्या तक्रारीवरून आरोपी शंकर गजानन वैरागडे रा. वनोजा याच्याविरुद्ध फिर्यादीच्या जबानी अहवाल व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे मंगरूळनाथ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ११८(१), ३५१(२), ३५१(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार चरण चव्हाण हे करीत आहे.