"छोटे हात, मोठी भरारी" प्रदर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नागपूर,
Hanuman Temple Janaki Nagar जानकी नगर येथील हनुमान मंदिर परिसरात सखी रंगतर्फे आयोजित "छोटे हात, मोठी भरारी" या बालकांच्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदर्शनाचा समारोप ७ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

tay 
 
 
तायक्वांदो प्रशिक्षक पृथ्वीराज शेळके यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुलांनी तायक्वांदोची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची दाद मिळवली. Hanuman Temple Janaki Nagar  प्रदर्शनात बालकांनी साकारलेल्या हस्तकला व विविध कलाकृती आकर्षणाचे केंद्र ठरल्या. या उपक्रमामुळे बालकांच्या कलागुणांना व सर्जनशीलतेला प्रोत्साहन मिळाले. प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्षा कुळकर्णी, शक्ती पुसदकर, सहभागी बालके व पालकांनी विशेष परिश्रम घेतले.
सौजन्य:अमोल पुसदकर,संपर्क मित्र