५० हजार रुपयासाठी विवाहितेचा छळ

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
 
मंगरूळनाथ, 
Harassment of a married woman येथील एका विवाहितेचा मोटारसायकल खरेदीसाठी माहेरहून ५० हजार रुपये आणण्याच्या मागणीवरून मानसिक व शारीरिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
harsh
 
फिर्यादी विद्या धवने (वय ३५ ) रा. संभाजी नगर मंगरूळनाथ यांच्या तक्रारीवरून पती विनोद लक्ष्मण धवने, सासू लीलाबाई लक्ष्मण धवने, कैलास लक्ष्मण धवने, संगीता बाळू कांबळे तसेच रोशन बाळू कांबळे व संभा बाळू कांबळे यांच्याविरुद्ध ९ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीच्या लेखी तक्रारीवर व महिला समुपदेशन कक्षाच्या अहवालाच्या आधारे मंगरूळनाथ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार गफूर करीत आहेत.