आयर्लंड दौऱ्यावर संशयाची छाया; BCCI सतर्क

बेलफास्ट हिंसाचारामुळे वाढली टेंशन

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ireland-vs-india : भारतीय संघ या महिन्याच्या अखेरीस आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन्ही संघ दोन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळतील, ज्यासाठी बीसीसीआयने संघांची घोषणा केली आहे. भारतीय संघाने आयर्लंड दौऱ्याची तयारी सुरू केली आहे, परंतु आयर्लंडमधील बेलफास्ट येथे झालेल्या हिंसक अशांततेमुळे ही टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका आता धोक्यात आली आहे, ज्यामुळे बीसीसीआयची चिंता वाढली आहे. आयर्लंडमधील परिस्थितीत सुधारणा न झाल्यास, सामन्याचे ठिकाण बदलले जाऊ शकते किंवा पुढे ढकलले जाऊ शकते.
 

ind vs ire 
 
 
 
बेलफास्टमध्ये हिंसक निदर्शने
 
उत्तर आयर्लंडची राजधानी बेलफास्टमध्ये सध्या अत्यंत हिंसक निदर्शने होत आहेत. गेल्या आठवड्यात एका सुदानी स्थलांतरिताने स्थानिक आयरिश नागरिकावर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटनेमुळे हा संताप निर्माण झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामुळे स्थानिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप निर्माण झाला. यानंतर, आयरिश नागरिक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी गैर-आयरिश (परदेशी) लोकांना लक्ष्य केले, त्यांच्या घरांची, दुकानांची आणि वाहनांची तोडफोड केली व त्यांना आग लावली. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
आयर्लंड बोर्डाने या घटनेबद्दल ट्विट केले
 
आयर्लंड क्रिकेट बोर्डाने आता या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आयर्लंड क्रिकेटने म्हटले आहे की ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत आणि योग्य वेळी निर्णय घेतील. लिस्बर्नमधील आंतर-प्रांतीय टी२० महोत्सवही अशांततेमुळे रद्द झाल्यानंतर हे निवेदन आले आहे. क्रिकेट आयर्लंडने हे देखील स्पष्ट केले की या आठवड्याच्या अखेरीस होणाऱ्या आयर्लंड सिनियर कप आणि नॅशनल कप सामन्यांबाबतचा निर्णय ४८ तासांच्या आत घेतला जाईल.
 
 
 
 
आयर्लंड मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
 
बीसीसीआय निवड समितीने ६ जून रोजी आयर्लंड आणि इंग्लंड मालिकेसाठी संघांची घोषणा केली. या मालिकेत श्रेयस अय्यर भारतीय संघाचे नेतृत्व करेल. सूर्यकुमार यादवच्या जागी भारतीय संघाचा नवा टी२० कर्णधार म्हणून निवड झाली आहे. आयपीएल २०२६ मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज वैभव सूर्यवंशीचा भारतीय संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. या मालिकेतील पहिला सामना २६ जून रोजी, तर दुसरा टी२० सामना २८ जून रोजी खेळला जाईल.