देवळी तालुयात ५१५ अतिक्रमणधारकांचे पट्टे नियमाकूल

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
*आ. बकाने यांच्या पाठपुराव्याला यश
 
देवळी, 
Land leases for encroachers तालुयातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अतिक्रमणधारकांच्या पट्टे नियमाकूल करण्याच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. आ. राजेश बकाने यांच्या पाठपुराव्यामुळे आतापर्यंत ५१५ अतिक्रमणधारकांचे पट्टे नियमाकूल करण्यात आले आहेत. यामुळे शेकडो कुटुंबांच्या मालकी हक्काचा प्रश्न मार्गी लागला आहे. पूर्वी कार्यरत असलेल्या शती प्रदत्त समितीमार्फत ३६७ अतिक्रमणधारकांचे पट्टे नियमाकूल करण्यात आले होते. त्यानंतर शासनाच्या निर्देशानुसार स्थापन करण्यात आलेल्या तालुकास्तरीय अतिक्रमण नियमाकूल समितीमार्फत आणखी १४८ प्रकरणांना मंजुरी देण्यात आली. अशा प्रकारे दोन्ही समित्यांच्या माध्यमातून देवळी तालुयातील ५१५ कुटुंबांना मालकी हक्क मिळवून देण्यात यश आले आहे.
 
 
bakane
 
Land leases for encroachers  तालुकास्तरीय अतिक्रमण नियमाकूल समितीमार्फत मंजूर करण्यात आलेल्या १४८ लाभार्थ्यांमध्ये नाचणगाव येथील ३४ लाभार्थ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. शिरपूर १९, खर्डा १५, टाकळी चना १३, गौळ १२, आपटी-वाघोली ११, कांदेगाव ११, गुंजखेडा ६, कळोणा चोरे ६, इसापूर ५, आंजी (ब) ३, लोणी ३, हिवरा (का) ३, कविटगाव २, अडेगाव २, आंबोडा १, तळणी (खं) (१) आणि दापोरी (१) या गावांतील लाभार्थ्यांचा समावेश आहे. या संदर्भात आ. बकाने म्हणाले की, अनेक कुटुंबे वर्षानुवर्षे त्या जागेवर वास्तव्यास असून त्यांना कायदेशीर संरक्षण मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. आज ५१५ कुटुंबांना मालकी हक्काचा मार्ग मोकळा झाला. पट्टे नियमाकूल झाल्यामुळे लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना, प्रधानमंत्री आवास योजना व इतर घरकुल योजना, बँक कर्ज, वीज जोडणी, पाणीपुरवठा, मालमत्ता नोंदी तसेच इतर मूलभूत सुविधांचा लाभ घेणे अधिक सुलभ होईल असे आ. बकाने म्हणाले.