कोसळण्याच्या स्थितीतील वीजवाहक खांबाला लाकडाचा आधार

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
महावितरण प्रशासन बघतय अपघाताची वाट
 
मानोरा, 
Mahavitaran power pole तालुयातीलकारखेडा येथील सर्वे क्रमांक ३० मधील शेतातून जाणारी मुख्य वीजवाहिनी अत्यंत धोकादायक अवस्थेत असून संबंधित वीज खांब मोठ्या प्रमाणात झुकला आहे. सदर शेताचे मालक कृष्णकुमार गजानन सोळंके असून, शेताची मशागत चंद्रकांत गजानन देशमुख करीत आहेत. विशेष म्हणजे, या परिसरातील वीज विभागाचे फिटर व लाईनमन नियमितपणे या मार्गाने ये-जा करतात. झुकलेल्या खांबाची व धोकादायक स्थितीची त्यांना पूर्ण माहिती असूनही अद्याप कोणतीही ठोस दुरुस्ती करण्यात आलेली नाही, असा आरोप शेतकरी व ग्रामस्थांनी केला आहे.
 
 
mahavidksl
 
शेतकर्‍यांनी अनेक वेळा तोंडी सूचना व तक्रारी करूनही संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे सांगितले जात आहे. सध्या शेतातील कामे सुरू असताना मजूर, शेतकरी व जनावरांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वादळी वारे किंवा पावसामुळे खांब कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शयता नाकारता येत नाही. संभाव्य अपघात टाळण्यासाठी महावितरण प्रशासनाने तातडीने पाहणी करून झुकलेला खांब दुरुस्त करावा व जबाबदार अधिकार्‍यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून होत आहे.वीज अधिनियम २००३ कलम १६१ नुसार धोकादायक स्थितीत असलेल्या विजेच्या तारा, खांबाची तक्रार मिळाल्यापासून २४ तासाच्या आत दुरुस्ती बंधनकारक असते व ती नाही झाली तर त्याची जबाबदारी संबंधित महावितरण प्रशासनावर असते.