वर्धा,
NEET paper leak case नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वर्धा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी सायंकाळी शहरात मशाल मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा नागपूर विभागीय प्रभारी कपिल ढोके यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेला मोर्चा ठाकरे मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आला. हातात मशाली आणि निषेधाचे फलक घेऊन निघालेल्या आंदोलकांनी विद्यार्थ्यांना न्याय द्या, नीट घोटाळ्याची चौकशी करा, धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या घोषणा दिल्या.
लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून नीट परीक्षेची तयारी करतात. मात्र, पेपरफुटीमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणार्या या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
NEET paper leak case मोर्चात युवक काँग्रेसचे जिल्हा प्रभारी सागर चव्हाण, सहप्रभारी आयुषी देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील कोल्हे, माजी जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर, शेखर शेंडे, महिला जिल्हाध्यक्ष अरुणा धोटे, युवक काँग्रेस प्रदेश सचिव अफझल बेरा, प्रदेश सचिव अंकुश मुंजेवार, एनएसयूआय अध्यक्ष विश्वभूषण पाटील, अंकित हिवरे, अमित ददगल, प्रतीक सूर्यवंशी, अमोल उघडे, प्रीतम हिंवज, शिवराज शिंदे, अंशुल भोसले, हिमांशू ठाकरे, आयुष ढोमणे आणि इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.