युवा मोर्चातर्फे स्थळांवर महाआरती, जलाभिषेक व प्रार्थना
यवतमाळ,
PM Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनसेवेची सलग 12 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य व राष्ट्रसेवेसाठी अखंड ऊर्जा लाभावी या उद्देशाने भाजपा नेते मदन येरावार, जिल्हाध्यक्ष अॅड. प्रफुल्ल चौहान यांच्या सूचनेनुसार युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने संपूर्ण यवतमाळ विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी महाआरती, जलाभिषेक व प्रार्थना कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यवतमाळ शहरातील महारुद्र मंदिर, आर्णी नाका येथे भगवान भोलेनाथांचा जलाभिषेक करून महाआरती करण्यात आली. यवतमाळ ग्रामीणमधील वाई, बोरी चंद्रशेखर, राजीवनगर, गांधी चौक, शिंदेनगर, शिव सैलानी बाबा धाम, काळे लेआऊट वडगाव, भोसा, मोहा फाटा येथील विविध मंदिरांमध्ये महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण उपक्रमाचे समन्वय व नियोजन जिल्हा महामंत्री सूरज जैन, विद्यार्थी विभाग संयोजक अजिंक्य शिंदे, जिल्हा सचिव पंकज दाढे, रत्नदीप पवार, शहर अध्यक्ष (दक्षिण) स्वप्निल उलंगवार, (उत्तर) मयूर लोखंडे, तालुका अध्यक्ष निहाल घोगरे, बोरी ग्रामीण मंडळ अध्यक्ष अक्षय जाधव, शहर महामंत्री सिद्धेश लांडे, रोशन खोंडे, शहर उपाध्यक्ष खुशाल गायकवाड यांनी केले. विविध कार्यक्रमांमध्ये भाजपा जिल्हा महामंत्री रेखा कोठेकर, जिल्हा उपाध्यक्ष कीर्ती राऊत, महिला आघाडी प्रदेश सचिव माया शेरे, भाजपा शहराध्यक्ष नितीन गिरी, योगेश पाटील, उपसभापती सोनाली तिडके, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शैला मिर्झापूरे, जिल्हा महामंत्री निर्मला विणकरे, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री परिक्षित आडे, जिल्हा उपाध्यक्ष जय चौधरी, प्रसिद्धीप्रमुख उमेश राठोड, भाजपा शहर महामंत्री अभिषेक श्रीवास, प्रशांत देशमुख, विद्यार्थी विभाग जिल्हा सहसंयोजक नयन गुप्ता, अजय चमेडिया, अथर्व पाटील, विद्यार्थी विभाग संयोजक कृष्णा डफळे, गजानन धावतोडे, जुगल तिवारी, विजय खडसे, नगरसेवक पंकज देशमुख, बाळू काळे, बाभुळगाव मंडळ अध्यक्ष नितीन परडखे, संतोष वर्मा, सत्यजित आडे, महिला आघाडी शहराध्यक्ष पुष्पलता सप्रे, तसेच विविध भागांतील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.