वर्धा,
Prime Minister Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसर्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत इतिहास रचला असून सर्वाधिक काळ सेवा करणारे पंतप्रधान होण्याचा गौरव त्यांनी प्राप्त केला आहे. या पृष्ठभूमीवर त्यांच्या उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व उज्ज्वल भविष्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने रविवार १४ रोजी सकाळी १०.३० वाजता साई मंदिर येथे महाआरती तसेच जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. पंकज भोयर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी खासदार सुरेश वाघमारे, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, नगर परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीपसिंह ठाकूर, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा वैशाली येरावार, साई सेवा ट्रस्टचे सचिव सुभाष राठी, भाजपचे शहर अध्यक्ष निलेश किटे, जिपच्या उप मुख्य कार्यकारी मनिषा कुरसंगे आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिपच्या माजी शिक्षण सभापती जयश्री गफाट, महिला व बाल कल्याण समितीच्या माजी सभापती सोनाली कलोडे, सरस्वती मडावी यांनी केले आहे.