पंढरपूर/सोलापूर,
Rohit Pawar शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या आंदोलनाला काही वेळातच सुरुवात होणार आहे. मात्र, आंदोलनासाठी पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील नियोजित आंदोलनावरून प्रशासनाने नोटीस बजावली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न Rohit Pawar तसेच वाहतूक व्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पोलिसांनी ही नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. याआधी महापालिकेकडून पर्यायी मोकळ्या जागेत आंदोलन करण्याचे सुचवण्यात आले होते, मात्र रोहित पवार यांनी ठरलेल्या ठिकाणीच आंदोलन करण्यावर ठाम भूमिका घेतल्याचे दिसून आले.दरम्यान, आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांकडून रोहित पवार यांना नोटीस देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात पक्षाचे चार आमदार आणि एक खासदार असतानाही या आंदोलनाबाबत इतर आमदारांना कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नसल्याची बाब समोर आली आहे. आमदार उत्तम जानकर आणि आमदार अभिजीत पाटील यांनीही याबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे.
या घटनेमुळे पक्षातील संवाद आणि समन्वयावरून Rohit Pawar चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, रोहित पवार यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना सरकारवर टीका केली आहे. विठुरायाच्या पंढरीत आंदोलनास अडथळे आणले जात असल्याचा आरोप करत, संविधानाने दिलेल्या आंदोलनाच्या अधिकाराचा उल्लेख त्यांनी केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी सुरू होणारे अन्नत्याग आंदोलन कोणत्याही परिस्थितीत थांबणार नसल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.या घडामोडींमुळे पंढरपूर परिसरात राजकीय वातावरण तापले असून पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. प्रशासन आणि आंदोलनकर्ते यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील काही तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.