ती एक वर्षांपूर्वी सासरी अन् आता ती कायमचीच गेली...

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
डॉ. संदीप लोंढे
आजनसरा, 
Saint Bhojaji Maharaj वर्षभरापूर्वी ज्या हातांवर नव्या संसाराची मेहंदी खुलली होती, त्याच हातांच्या आठवणी आज अश्रूंमध्ये विरघळल्या आहेत. वर्षभर्‍यापूर्वी सनई-चौघड्यांच्या मंगल स्वरांनी दुमदुमलेले घर आज हंबरड्याने हादरले आहे. अवघ्या २५ वर्षांच्या वैष्णवीचे अकाली निधन झाले. हृदयावरील शस्त्रक्रियेनंतर तिची प्राणज्योत मालवली. एक वर्षांपूर्वी ती सासरी गेली म्हणून डोळे पानावले होते आता ती कायमची निघून गेल्याने अश्रू अनावर झाले.
 
 
vasksa;k
 
संत भोजाजी महाराज पंढरपूर पालखीचे प्रमुख वारकरी प्रभाकर पारवटकर यांची लेक वैष्णवीचा गेल्या वर्षी संत भोजाजी महाराज मंदिर सभागृहात मोठ्या थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. तिने सासरी पाऊल टाकलं. संसाराची नवी स्वप्नं, नवे रंग... सर्व काही सुरळीत सुरू होतं. पण, वैष्णवीच्या सुखाला कुणाचीतरी नजर लागली. काही दिवसांपूर्वी वैष्णवीची प्रकृती बिघडली. तपासण्या केल्यानंतर काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली. तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. लगेचच तिला उपचारासाठी नागपूर येथील एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. वैष्णवी पुन्हा हसतमुखाने घरी परतेल अशी आशा होती. मात्र, काल ११ जून रोजी शस्त्रक्रियेनंतर वैष्णवीने अखेरचा श्वास घेतला.