संस्कारामुळे विचारांना योग्य दिशा मिळते : परमेश्वर व्यवहारे

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
शेवती येथे संस्कार शिबिराचे उद्घाटन
 
कारंजा लाड, 
sanskar shibir  शिक्षण आणि संस्कार हे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे घटक ठरतात. शिक्षणाकडे पालकांनी केवळ अर्थप्राप्तीचे साधन म्हणून पाहू नये तर त्याकडे संस्काराचे माध्यम म्हणून पहावे. शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना ज्ञान कौशल्य व चांगले विचार प्राप्त होतात. तर संस्कारामुळे या विचारांना योग्य दिशा मिळते, असे उद्गार गुरुदेव सेवा मंडळाचे प्रसिद्ध प्रमुख परमेश्वर व्यवहार यांनी काढले.
 
 
shibir
 
ग्राम शेवती येयील श्री हरीभाऊ नाईक प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेत आयोजित केलेल्या सुसंस्कार शिबिरात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक राजेश वर्मा होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी सुनील दशमुखे होते. प्रारंभी भागवत तूरक यांनी शिबिराची रूपरेषा स्पष्ट केली. शिबिराचे प्रयोजन व महत्व विषद करताना सुनील दशमुखे म्हणाले की, लहान मुलावर योग्य वेळी योग्य संस्कार रुजवले तर मुले सुसंस्कारित होतात. त्यांच्यामधील चांगले सद्गुण वाढीस लागतात. त्यांच्यामध्ये शिस्त निर्माण होते. मोठ्याबद्दल आदरभाव वाढतो. चांगले वाईट यातील भेद त्यांना समजू शकते. थोडयात संस्कार शिबिरातून मुलांमध्ये जीवनमूल्य रुजवली जात असल्याचे त्यांनी सांगितले. हे शिबीर ८ दिवस चालणार असून शिबिराचे संयोजक भाऊराव जाधव आणि गुरुदेव सेवा मंडळाचे मान्यवर व्यक्ती वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहे.
 
 
sanskar shibir  उन्हाळ्याची सुट्टी असूनही विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार भागवत तूरक यांनी केले. या वेळी उदय सरनाईक, अभय सोळंके पराग लांडे, गजानन राऊत, कुणाल महल्ले ,सुरेश मस्के, ज्योती जाधव, पूजा ढोरे, मिलिंद देवडे आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.