१२ केंद्रांवरून ३१२९ जणांची गट ‘ब’ सेवा संयुत पूर्व परीक्षा

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
वर्धा, 
seva sanyukt purv pariksha रविवार १४ जून रोजी जिल्ह्यातील १२ केंद्रांवरून महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुत पूर्व परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठीचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नोडल अधिकारी म्हणून निवासी उपजिल्हाधिकार्‍यांची नियुती करण्यात आली आहे.
 

seva 
 
शहरातील जानकी देवी बजाज विज्ञान महाविद्यालय, गो. से. वाणिज्य महाविद्यालय, सुशिल हिंमतसिंगका विद्यालय, न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालय, रत्नीबाई विद्यालय, केसरीमल कन्या विद्यालय, यशवंत महाविद्यालय, न्यू आर्टस्-कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज, भरत ज्ञान मंदिरम् कॉन्व्हेंट अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यालय तर पिपरी मेघे भागातील अग्रग्रामी हायस्कूल, श्रीकृष्णदास जाजू ग्रामीण सेवा विद्यालय या परीक्षा केद्रांवरून ३ हजार १२९ परीक्षार्थी महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा देणार आहे. ही परीक्षा पारदर्शक व्हावी याकरिता उपकेंद्र प्रमुख, पर्यवेक्षक, समादेशक, लिपीक, शिपाई असे एकूण २७६ जण विशेष प्रयत्न करणार आहे. सकाळी ११ ते दुपारी १२ या वळेत ही परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान मोबाईल वापरावर बंदी राहणार आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यानेही परीक्षा सुरू होण्याच्या १ तास पूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे अपेक्षीत असल्याचे सांगण्यात आले.