नागपूर,
Sriram Yoga Group श्रीराम योगा ग्रुप व योग संस्कार शिबिर यांच्या संयुक्त विद्यमाने अमरनगर येथील समाज भवन, श्री गजानन मंदिर सभागृहाजवळ नि:शुल्क योग संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
योगशिक्षक नरेश चिंतामणराव भांदककर, श्रीकृष्ण इंगोले, चंद्रकांत खोडे, कडू सर, गंगाधर पराते,अरुणा पोटभरे व डॉ. स्वाती राठोड यांनी सहभागीांना योगाचे महत्त्व,Sriram Yoga Group विविध आसने आणि निरोगी जीवनशैली विषयी मार्गदर्शन केले.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी देविदास आगरकर, वसंतराव इझनकर, जया रासेकर, गणपतराव निंबाळकर, हिरुळकर, धवल, भोयर, घोरमाडे व रमेश जिल्हारे यांनी विशेष सहकार्य केले.
सौजन्य:उज्ज्वल रोकडे,संपर्क मित्र