पुणे,
Deputy Collector Jyoti Kadam पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १३ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत कडक जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी हे आदेश जारी केले असून, या काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
या आदेशानुसार, कोणतीही सार्वजनिक सभा, मिरवणूक किंवा पाच किंवा त्याहून अधिक व्यक्तींचे एकत्र जमणे जिल्हा पोलीस अधीक्षक किंवा सक्षम प्राधिकरणाची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पूर्णपणे प्रतिबंधित करण्यात आले आहे. संभाव्य अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
काय आहे आदेश?
जारी करण्यात आलेल्या Deputy Collector Jyoti Kadam आदेशात शस्त्र आणि स्फोटक पदार्थ बाळगण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. तलवारी, बंदुका, काठ्या, धारदार शस्त्रे तसेच दगड किंवा कोणतेही दाहक अथवा स्फोटक पदार्थ सोबत बाळगणे या कालावधीत पूर्णपणे निषिद्ध असेल. तसेच सार्वजनिक ठिकाणी आक्रमक स्वरूपाची भाषणे करणे, घोषणा देणे किंवा दोन गटांमध्ये तेढ निर्माण होईल अशी चिथावणीखोर वक्तव्ये करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.याशिवाय कोणत्याही प्रकारचे प्रतीकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे देखील या काळात मनाई करण्यात आली आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, या निर्णयाचा उद्देश सामाजिक शांतता आणि सार्वजनिक सुव्यवस्था कायम राखणे हा आहे.दरम्यान, शासकीय कर्मचारी, पोलीस दलातील ऑन-ड्युटी अधिकारी तसेच वरिष्ठांच्या आदेशानुसार अधिकृतपणे शस्त्र बाळगण्यास परवानगी असलेल्या व्यक्तींना या नियमातून सूट देण्यात आली आहे. मात्र, इतर सर्व नागरिक, संस्था आणि संघटनांनी या आदेशाचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे.कोणत्याही व्यक्तीने या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.