*पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे बारा वर्षात विकासाचा प्रवास प्रगतीपथावर
बुलढाणा,
Union Minister Prataprao Jadhav. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने गेल्या बारा वर्षात केलेली विकासकामे सर्वच क्षेत्रात राबविण्यात आलेल्या गोरगरिबांच्या शेतकर्यांच्या आर्थिक प्रगतीच्या योजना काश्मीरचे ३७० कलम हटविले, डिजिटल का्रंतीने पाश्यत्य देशांना मागे टाकले. दहशतवाद विरोधी धोरणामुळे राज्य सरकारच्या मदतीने दहशतवाद संपूष्टात आणला औद्यगिर क्रांती नागरी सुविधा ग्रामणी व शहरी भागात दळवळणीची रस्ते महामार्ग समृद्धी महामार्ग, खामगाव जालना रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची कामे नदीजोड प्रकल्प गरिबांसाठी घरकूल योजना शौचालय मुक्त गाव, आरोग्य योजना किसान सन्मान योजना सुर्यघर नारी सशक्तीकरण आर्थिक व सुरक्षा व्यवस्थेत विकसित भारत सध्या जगात तिसर्या क्रमांकावर असल्याचे केंद्रिय आयुष राज्य मंत्री प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे दि. १२ जून रेाजी सायंकाळी ५ वाजता झालेल्या पत्रकार परिषदेला राज्याचे कामगार मंत्री अॅड. आकाश फुंडकर, आ. संजय गायकवाड, भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख ओमसिंग राजपूत, माजी नगराध्यक्ष बळीराम मापारी, उपनगराध्यक्ष बुलढाणा गजेंद्र दांदडे प्रामुख्याने उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे १२ वर्ष विकास प्रवासाची माहिती देतांना केंद्रिय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले मोदी सरकारने जास्त वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याने पंडीत नेहरूंचे पंतप्रधान पदाचा विक्रम तोडला. नरेंद्र मोदी यांची निर्यणक्षमता निर्भिड विकासाची दुरदृष्टीचे निर्णय घेतले त्यात प्रामुख्याने काश्मीरचे ३७० कलम न्यायप्रविष्ट प्रकरण असतांना हटविण्यात आले. आयोध्येतील श्रीराम मंदीर पूर्णत्वास नेले. याशिवाय दहशतवाद विरोधी धोरण केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केंद्र व राज्य सरकारच्या राबविले. औद्यगिक क्रांती डिजिटल क्रांती, नागरी सुविधा, ग्रामीण भागात भ्रमण ध्वनी मनोरे दळवळणाची सुविधा निर्माण करतांना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचा समृद्धी महामार्ग देशभरात संपूर्ण राज्याला जोडणारे महामार्ग रस्ते विकास शिवाय रेल्वे मार्ग अकोट बर्हाणपूर खामगाव जालना मार्गासाठी निधी उपलब्ध करून दिला. २५ कोटी दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला प्रत्येक योजनेचा लाभ पोहचविला घरगुती गॅस, शौचालय मुक्त गाव नळाद्वारे पिण्याचे पाणी, लहान मोठ्या उद्योगाला कर्ज, किसान सन्मान योजना सर्वसामान्यांना १२ लाखापर्यंत करातून मुक्तता, पी. एम. सुर्यघर योजना, बारा बलुतेदारांना विश्वकर्मा योजना, आरोग्य विभागाचे आयुष्यमान भारत, जिल्हास्थानी वैद्यकीय कृषी महाविद्यलयाची निर्मिती अशा सर्व स्तरात संपूर्ण जगाने त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे. असे त्यांनी आवर्जून सांगितले. याप्रसंगी बोलतांना कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी गेल्या १२ वर्षात पंतप्रधान मोदी सरकारने सबका साथ सबका विकास दृष्टीकोन प्रत्येक क्षेत्रात योजना राबवून देशात लोकप्रियता निर्माण केली. २२ राज्यात महायुती एनडीए सरकार स्थापन झाले. बुलढाणा जिल्ह्यासाठी जिगाव प्रकल्प नळगंगा वैनगंगा प्रकल्प सिंचनाच्या दृष्टीने आर्थिक क्रांती ठरणार आहे.