नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती
वणी,
मानव-वन्यजीव संघर्षामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना कायदेशीर मदत, तातडीची भरपाई तसेच पुनर्वसनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी यवतमाल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने प्राधिकरणाने विशेष नोडल अधिकारी म्हणून Vasudev Vidhate वासुदेव विधाते यांची नियुक्ती केली आहे.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना कायदेशीर सहाय्य, त्वरित भरपाई आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देणे हा आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार पॅरा विधी स्वयंसेवक वासुदेव विधाते यांची यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते संबंधित पीडितांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आवश्यक समन्वय साधणार आहेत.
वन विभागालाही या नियुक्तीची माहिती देण्यात आली असून मानव व वन्यजीव संघर्षग्रस्तांना तातडीने मदत व न्याय मिळवून देण्यासाठी समन्वयाने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात बाधित नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.