बंद पडलेली जलशुद्धीकरण केंद्रे तातडीने सुरू करा

    दिनांक :12-Jun-2026
Total Views |
शिवसेनेचे नगर परिषदेला निवेदन

वणी, 
Water purification plants शहरातील विविध भागात नगर परिषदेमार्फत उभारण्यात आलेली जलशुद्धीकरण केंद्रे दुरुस्तीअभावी बंद पडल्याने नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही केंद्रे तातडीने दुरुस्त करून पूर्ववत सुरू करण्यात यावीत, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने नगर परिषद प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
 
 
dkslsdk
 
बुधवार, 10 जून रोजी शिवसेनेचे जिल्हा संघटक विजय चोरडिया यांच्या नेतृत्वात नप मुख्याधिकाèयांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात शहरातील नागरिकांना शुद्ध व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उद्देशाने नपमार्फत विविध जलशुद्धीकरण केंद्रे उभारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र, काही दिवसांपासून काही केंद्रांमधील यंत्रसामग्री बिघाडामुळे ती बंद अवस्थेत असून अद्याप त्यांची दुरुस्ती करण्यात आली नसल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
 
 
 
जलशुद्धीकरण केंद्रे बंद असल्यामुळे नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळण्यात अडचणी निर्माण होत असून त्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेली केंद्रे तत्काळ दुरुस्त करून पुन्हा सुरू करावीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे मनीष सुरावार, शुभम गोरे, राहुल मुंजेकर, राहुल पारखी, संगीता मुरस्कर, वसुधा ढगे, प्रणोती बांगडे, भाग्यश्री वैद्य तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.