फिफाच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं!

पहिल्याच मॅचमध्ये राडा!

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मेक्सिको सिटी
fifa world cup फिफा वर्ल्ड कप स्पर्धेला आता सुरुवात झाली आहे. मेक्सिको आणि साऊथ अफ्रिका यांच्यात पहिला सामना खेळवला गेला होता. या सामन्यात देखील मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. मेक्सिको सिटी येथील ऐतिहासिक एस्टाडिओ अझ्टेका स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या उद्घाटनाच्या सामन्यात मेक्सिकोने साऊथ आफ्रिकेचा 2-0 अशा फरकाने पराभव केला. या विजयासह मेक्सिकोने ग्रुप ‘ए’ मधील आपल्या मोहिमेची दिमाखात सुरुवात केली आहे.
 
red card 
fifa world cup सामना पूर्वार्धापेक्षा उत्तरार्धात अधिक नाट्यमय ठरला. दुसèया हाफमध्ये मैदानावरील दोन्ही बाजूंचे खेळाडू एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे रेफरीने तब्बल तीन रेड कार्ड दाखवावे लागले. फिफाच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलंय.
fifa world cup मॅचच्या 50 व्या मिनिटाला साऊथ आफ्रिकेच्या याया सिथोलेला रेड कार्ड मिळाल्याने त्यांचा संघ 10 खेळाडूंचाच राहिला. यानंतर थेंबा झ्वानेसह मेक्सिकोच्या सेझर मॉन्टेसलाही रेड कार्ड मिळाले. ज्युलीयन क्विनोन्स याने मॅचच्या 9 व्या मिनिटालाच शानदार गोल करत मेक्सिकोला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. याचा फायदा घेत 67 व्या मिनिटाला राऊल जिमेनेझने अप्रतिम हेडर करत दुसरा गोल केला.
fifa world cup यामुळे मेक्सिकोचा 2-0 असा विजय निश्चित करून 3 पॉइंट्स मिळवून दिले. विशेष म्हणजे, अगदी 16 वर्षांपूर्वी म्हणजेच 11 जून 2010 रोजी देखील साऊथ आफ्रिका आणि मेक्सिको यांच्यातच वर्ल्ड कपची पहिली मॅच झाली होती, जी 1-1 अशी ड्रॉ झाली होती.यंदा ग्रुप ’ए’ मध्ये मेक्सिको, साऊथ आफ्रिका, झेकीया आणि साऊथ कोरिया हे संघ असून मेक्सिको अव्वल स्थानासाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. त्यामुळे आता स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहोचल्याचं पहायला मिळत आहे.