खत खरेदीसाठी आधारकार्ड व सातबारा अनिवार्य नाही

जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित आदेश जारी

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
अकोला,
purchasing fertilizer अकोला-जिल्ह्यात युरिया आणि डी.ए.पी. खतांच्या खरेदीसाठी प्रशासनाने नवीन सुधारित आदेश जारी केले आहेत. जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी याबाबतचा आदेश जारी केला. खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ओळख पटवण्यासाठी ७/१२ उतारा आणि आधार कार्ड घेणे आता अनिवार्य नाही.
 

dp_khat 
 
 
 
जिल्हाधिकारी यांनी दोन दिवसांपूर्वी रासायनिक खतांची खरेदी करताना आधार कार्ड व सातबारा अनिवार्य करण्याचा आदेश जारी केला होता. दरम्यान आता सुधारित आदेश जारी करून सातबारा व आधार कार्ड शेतकऱ्यांसाठी ओळख पटवण्यासाठी अनिवार्य नाही.प्रतिएकरी मर्यादित खत वाटप एका शेतकऱ्याला त्याच्या गरजेनुसार पेरणीपुरते किमान १ पोते आणि जास्तीत जास्त ५ पोते युरिया व डी.ए.पी. खताचे वाटप केले जाईल.
 
कोणत्याही व्यक्तीला ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त खताचा साठा दिला जाणार नाही.सर्व घाऊक व किरकोळ खत विक्रेत्यांनी प्रत्येक विक्रीची नोंद योग्य कागदपत्रांसह आपल्या नोंदवहीत अद्ययावत ठेवणे बंधनकारक आहे. खतांचा तुटवडा रोखण्यासाठी आणि गरजू शेतकऱ्यांना वेळेवर खत मिळवून देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे.purchasing fertilizer या आदेशाचे उल्लंघन करून खतांचा काळाबाजार किंवा साठेबाजी केल्यास संबंधित कृषी सेवा केंद्रावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.