'अब होगा हिसाब’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

१८ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला नवी सूडकथा

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
मुंबई
ab hoga hisaab भारतातील आघाडीची मोफत, प्रीमियम आणि जाहिरात-आधारित व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा ॲमेझॉन एमएक्स प्लेअरने आपल्या बहुप्रतीक्षित ओरिजिनल वेब सीरिज ‘अब होगा हिसाब’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. पंजाबच्या पार्श्वभूमीवर उलगडणारी ही सूडकथा नातेसंबंध, विश्वासघात, रहस्य आणि संघर्ष यांचा रोमांचक संगम प्रेक्षकांसमोर आणणार आहे. ही सीरिज १८ जूनपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर मोफत स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.
 

Ab Hoga Hisaab trailer, ab hoga hisaab web series, Amazon MX Player original series, 
आरे स्टुडिओच्या निर्मितीखाली तयार झालेल्या या मालिकेत संजय कपूर, शाहीर शेख, मौनी रॉय आणि अविनाश मिश्रा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासोबत निमृत कौर अहलुवालिया, हरमन सिंघा आणि आशीमा वर्दान हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये ab hoga hisaab  बॉबी आणि बंटी मनोचा या दोन भावांची कथा दाखविण्यात आली आहे. आपल्या धाकट्या भावाला उज्ज्वल भविष्य मिळावे यासाठी बॉबी त्याला परदेशात पाठविण्याचे स्वप्न पाहत असतो. मात्र एका अनपेक्षित घटनेनंतर त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळते. गूढरीत्या लोक बेपत्ता होण्याच्या घटनांच्या मालिकेदरम्यान प्रभावशाली गोल्डी बंटीला एक आकर्षक संधी देतो. त्यानंतर बंटी अचानक गायब होतो आणि संशयाचे सावट अधिक गडद होते. आपल्या भावाला शोधण्यासाठी आणि सत्य समोर आणण्यासाठी बॉबीची सुरू झालेली धडपड अनेक धक्कादायक रहस्ये उघड करते. या प्रवासात त्याला फसवणूक, कटकारस्थान आणि खोट्या आरोपांना सामोरे जावे लागते.
 
 
सीरिजबाबत बोलताना ॲमेझॉन एमएक्स प्लेअरचे कंटेंट प्रमुख अमोघ दुसाद यांनी सांगितले की, ‘अब होगा हिसाब’ ही भावांमधील नात्याची, सूडाची आणि मानवी भावनांच्या गुंतागुंतीची प्रभावी कथा आहे. संजय कपूर, शाहीर शेख, मौनी रॉय आणि अविनाश मिश्रा यांसारख्या प्रतिभावान कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे मालिकेला वेगळी उंची प्राप्त झाली आहे. भारताच्या मातीत रुजलेल्या आणि देशभरातील प्रेक्षकांशी भावनिक नाळ जोडणाऱ्या कथा मोफत स्वरूपात सादर करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचे हे आणखी एक उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.मालिकेत गोल्डीची भूमिका साकारणारे संजय कपूर यांनी सांगितले की, व्यक्तिरेखांची खोली आणि कथानकातील गुंतागुंत यामुळे ते या प्रकल्पाकडे आकर्षित झाले. नाती आणि भावबंध यांचे वास्तवदर्शी चित्रण ही या मालिकेची सर्वात मोठी जमेची बाजू असून, कथेत सातत्याने येणारी अनपेक्षित वळणे प्रेक्षकांना खिळवून ठेवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 
 
बॉबीच्या भूमिकेत दिसणाऱ्या शाहीर शेखने आपल्या व्यक्तिरेखेच्या भावनिक बाजूबद्दल बोलताना सांगितले की, आपल्या कुटुंबासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी आणि भावाप्रती असलेली निष्ठा ही बॉबीची सर्वात मोठी ताकद आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयामागे कुटुंबाचे संरक्षण करण्याची भावना असून, हा प्रवास साकारताना त्याला विशेष समाधान मिळाल्याचे त्याने सांगितले.रहस्य, भावनिक संघर्ष आणि सूडाच्या तीव्र भावनांनी परिपूर्ण असलेली ‘अब होगा हिसाब’ ही सीरिज प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि थरारक अनुभव ठरणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. १८ जूनपासून ही मालिका ॲमेझॉन एमएक्स प्लेअरवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.