नाला खोलीकरण कामावर तीव्र नाराजी
जिल्हाधिकाऱ्यांचा घाटंजी दौरा
घाटंजी,
anji nrusinh tirthkshetra जिल्हाधिकारी विकास मीना यांनी घाटंजी तालुक्याच्या दौऱ्यात धार्मिक, शैक्षणिक आणि विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करून संबंधितांना आवश्यक निर्देश दिले. अंजी येथील प्रसिद्ध नृसिंह तीर्थक्षेत्रापासून ते जलसंधारण, शिक्षण आणि प्रशासकीय प्रकल्पांपर्यंत विविध कामांचा आढावा घेत त्यांनी विकासकामांच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याचे स्पष्ट बजावले. दौèयाची सुरुवात अंजी येथील प्राचीन नृसिंह मंदिराच्या भेटीने झाली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी भगवान नृसिंहाचे दर्शन घेत मंदिर परिसराची पाहणी केली. मंदिराचे विश्वस्त गोपाळ चोपडे यांनी शाल व श्रीफळ देऊन त्यांचे स्वागत केले.
यावेळी मंदिराचा ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारशाविषयी माहिती देण्यात आली. तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हाधिकाèयांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली. यानंतर त्यांनी अंजी परिसरातील शेतशिवारात सुरू असलेल्या विविध विकासकामांची पाहणी केली. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून कामांचा सविस्तर आढावा घेत प्रलंबित कामे गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय जिल्हाधिकाèयांनी घाटंजी नगर परिषदेच्या नाट्यगृहाच्या बांधकामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. नागरिकांना अधिक दर्जेदार सांस्कृतिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी जवाहर नवोदय विद्यालयाला भेट देऊन शैक्षणिक सुविधा, परिसरातील व्यवस्था आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध सोयी-सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली. दौèयाच्या शेवटी जिल्हाधिकाèयांनी नवीन प्रशासकीय इमारतीची पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. यावेळी तहसीलदार विजय साळवे, महसूल विभाग अधिकारी, कर्मचारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यामुळे अंजी नृसिंह तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती मिळण्यासोबतच जलसंधारण, शिक्षण, सांस्कृतिक सुविधा आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांच्या कामांना नवी चालना मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
रेंगाळलेले नाला खोलीकरण काम
दौèयातील सर्वाधिक लक्षवेधी बाब म्हणजे मृद व जलसंधारण विभागाच्या नाला खोलीकरण कामाची त्यांनी पाहणी केली. कामाची गुणवत्ता व प्रगती अपेक्षेनुसार नसल्याचे निदर्शनास येताच जिल्हाधिकाèयांनी संबंधित अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. विकासकामांमध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करत निर्धारित निकषांनुसार दर्जेदार व वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.