नाले सफाईसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
नगराध्यक्षांना निवेदन
तळेगाव (श्या.पं.), 
ashti: cleaning of drains आष्टी शहरातील मागील कित्येक महिन्यांपासून नाल्यांची सफाई न झाल्यामुळे संपूर्ण शहरातील नाल्या तुंबल्या आहेत. नाल्यांतील घाणपाणी रस्त्यावर वाहत असून संपूर्ण शहरात दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांच्या समस्या लक्षात घेता भाजपा कार्यकर्त्यांनी आष्टी नगरपंचायतीत ठिय्या देत शहरातील नाल्या सफाईची कामे तात्काळ हाती घेण्यात यावी, अशी मागणी नगराध्यक्षांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
 
 
asti
 
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झाले असून शहरातील नाल्यांची साफसफाई अद्याप झालेली नाही. कचरा साचल्याने नाल्या तुंबल्या आहेत. त्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहताना दिसत आहे. रस्त्यावरील सांडपाण्यामुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नाल्या कचर्‍याने तुंबल्याने जोराचा पाऊस आल्यास नाल्यातील पाणी घरात शिरण्याची भितीही व्यत केली जात आहे. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष अनिल धोत्रे यांना निवेदन देऊन याबाबत चर्चा केली. तसेच नपं मुख्याधिकारी यांच्या सोबत नाली सफाईकरिता पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, याबाबत चर्चा झाली. चर्चेतून त्यांनी समाधानकारक उत्तर देऊन येत्या दोन दिवसांत नाली सफाईकरिता मनुष्यबळ उपलब्ध करून देतो, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले. दरम्यान, तत्काळ कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.
 
 
यावेळी अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशोक विजयकर, तालुका महामंत्री तथा नगरसेवक अ‍ॅड. मनिष ठोंबरे, उत्तम बरगे, अक्षय राजूरकर, विजय खांडेकर, अतुल गुल्हाने, अनिल इखार, आवेज खान, सुधाकर सावरकर, अविनाश कदम, अनिल डोईफोडे, सौरभ तायडे आदी उपस्थित होते.