नागपूर,
Havrapeth महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) २०२६-२०२७ अंतर्गत बीएस्सी नर्सिंग आणि जनरल नर्सिंग ॲन्ड मिडवाइफरी (GNM) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नर्सिंग सीईटीचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा चार विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवत अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये हावरापेठ येथील क्रिस्तीना आशिष जेकब हिने १०० टक्के गुण मिळवत महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक आणि नागपूरमधून पहिला क्रमांक मिळवला आहे. या यशामुळे हावरापेठचे नाव राज्यभरात उज्ज्वल झाले असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिच्याकडून भविष्यात मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.

त्याचप्रमाणे हावरापेठ येथीलच रुचीता गुणवंत घरझाडे हिनेही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत नर्सिंग सीईटी परीक्षेत ८५ टक्के गुण मिळवले आहेत. दोन्ही विद्यार्थिनींनी पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट यश संपादन करून हावरापेठचा लौकिक वाढवला आहे. या यशानिमित्त हावरापेठ मित्र परिवार आणि गुरुदेव सेवा मंडळ यांच्या वतीने मिठाई वाटप करून व पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. Havrapeth भारतीय जनता पक्षाचे शहर कार्यकारिणी सदस्य मंगेश मोरे यांनी विद्यार्थ्यांच्या करिअरविषयक मार्गदर्शन केले. यावेळी गुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक रमेश मेहर, गजेंद्र मडावी, अनिकेत बांगडे, मनोहर मोरे, आशिष जेकब, राजू इटनकर आणि राकेश मोरे आदी उपस्थित होते.
सौजन्य: रमेश मेहर. संपर्क मित्र