यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी प्रचंड जनसमर्थन प्रतिसाद

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
सेवाभावी संस्था, ग्रामपंचायत देखील सरसावल्या

आर्णी, 
Demand for a railway line यवतमाळ-आर्णी-माहूर-किनवट रेल्वेमार्गासाठी या भागातील गावे आणि नागरिकांचा प्रचंड उत्साह असून जनआंदोलनची तयारी सुरू करण्यात आली आहे. या रेल्वे मार्गाच्या मागणीसाठी ग्रामपंचायतींनी ठराव घेतले असून ही मागणी आता व्यापक झाली आहे. ग्रामपंचायत पोहंडूळ, जवळा, भंडारी, अंतरगाव, तिवरंग, दहिसावळी, म्हसोला (कान्होबा), ब्राम्हणवाडा, कुèहा डुमणी, परसोडा, लोणबेहेळ यांनी यवतमाळ आर्णी माहूर किनवट रेल्वे मार्ग मागणीचा ठराव घेतला. त्याबद्दल सरपंच, उपसरपंच सदस्य, सचिव व गावकèयांचे रेल्वे कृती समितीने आभार मानले आहेत.
 
 
Relway
 
या रेल्वे मार्गाचे फायदे सांगणारे सुरेख पत्रक राजू नालमवार यांनी तयार केले असून सागर घोडेराव या अभियंत्याने सुंदर प्रस्तावित नकाशा केला आहे. हा मार्ग शेतकèयांना दिलासा देणारा असल्यामुळे आर्णी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल आडे यांनी समर्थन देणारा ठराव केला आहे. या मागणीला सर्वपक्षीय, सर्वधर्मीय जोरदार प्रतिसाद मिळतो आहे.
लोकचळवळीचे स्वरूप
‘गाव करी ते राव न करी’प्रमाणे यवतमाळ आर्णी माहूर किनवट या नव्या रेल्वे मार्गाची मागणी आता लोकचळवळ बनली आहे. या मागणीला आर्णी तालुक्यात सर्वच स्तरांवरून प्रचंड पाठिंबा मिळत असून त्यामुळे रेल्वे कृती समितीचे मनोबल वाढले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दखल घेत रेल्वेमंत्र्यांना दिलेले पत्र आणि आमदार राजू तोडसाम यांनी घेतलेली दखल यामुळे या मागणीस चांगला वेग आला आहे.

गुड मॉर्निंग ग्रुपकडून आगळावेगळा पाठिंबा
दररोज सकाळी पायी फिरून आरोग्याचा संदेश देणारा व विविध सामाजिक कार्य करणारा म्हणून सुपरिचित ‘गुड मॉर्निंग ग्रुप’ने एका व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती करत आपला पाठिंबा दिला. रेल्वे कृती समितीने त्यांचेही आभार मानले आहेत.