वर्धा,
cotton crop अंगाची काहीली होणार्या उन्हाची तमा न बाळगता शेतकर्यांनी उन्हाळवाहीची कामे पूर्ण केली. सध्या शेतकरी चातकासारखा दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यात दमदार पावसाचा पत्ता नसतानाच आतापर्यंत जिल्ह्यातील शेतकर्यांनी ६५० हेटरवर कपाशीची धूळ पेरणी केल्याची माहिती आहे. त्याला कृषी विभागाच्या अधिकार्यांकडूनही दुजोरा दिला आहे. संभाव्य दुबार पेरणीचे संकट टाळता यावे, याकरिता १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच शेतकर्यांनी पेरणी करावी, असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
शेतकर्यांनी खरीप हंगामाची संपूर्ण तयारी केली आहे. तर कृषी विभागाने खरीप पेरणी, खत व बियाण्यांच्या पुरवठ्याचे नियोजन केले आहे. यंदा कुठल्याही परिस्थितीत खत, बियाण्यांचा तुटवडा निर्माण होणार नाही, याची विशेष दक्षता कृषी विभागाकडून घेतल्या जात आहे. यंदाच्या खरीपात जिल्ह्यात सुमारे ४ लाख १८ हजार हेटरवर विविध खरीप पिकांची लागवड होणार, असा अंदाज कृषी विभागाचा आहे. शेतकरी खरीप हंगामात प्रामुख्याने कपाशी, सोयाबीन व तूर पिकाची लागवड करतात. यंदाच्या उन्हाळ्यात विक्रमी उष्णतामान राहिले. त्यामुळे शेतजमीनही चांगलीच तापली आहे. अशा परिस्थितीत धूळ पेरणीचा प्रकार धोयाचाच आहे, असे असले तरी जिल्ह्यातील आठही तालुयातील काही शेतकर्यांनी मोठे धाडस करीत कपाशीची धूळ पेरणी केल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६५० हेटरवर धूळ पेरणी झाल्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे.
स्प्रिंकलरद्वारे दिले जातेय पाणी
जिल्ह्यातील आठही तालुयात कमी अधिक प्रमाणात कपाशीची धूळ पेरणी झाल्याचे वास्तव आहे. ज्या शेतकर्यांकडे सिंचनाची सोय आहे. अशाच शेतकर्यांनी धूळ पेरणीचे धाडस केले आहे. त्यांच्याकडून स्प्रिंकलरद्वारे सिंचन केले जात आहे. वास्तविक पाहता जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस झाला नाही. अशातच पाऊस आणखी लांबणीवर गेल्यास धूळ पेरणी केलेल्या शेतकर्यांच्या अडचणीत मोठी भर पडण्याची शयता आहे.