‘फिफा’च्या दुसऱ्याच दिवशी मोठ्या खेळाडूचे निधन

मॅच 24 तासांवर असताना संघावर दु:खाचा डोंगर

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
ब्राझिलिया
fifa tournament  गुरुवारी 11 जून 2026 पासून फिफा वर्ल्डकप 2026 ला सूरूवात झाली आहे. पहिल्याच सामन्यात मेक्सिकोने साऊथ आफ्रिकेचा 2-0 ने पराभव केला आहे.त्यानंतर साऊथ कोरियाने 2-1 ने कझेचियाचा पराभव केला आहे. त्यानंतर आता स्पर्धेच्या दुसèयाच दिवशी एक दु; खद बातमी समोर आली आहे. फिफा वर्ल्ड कपच्या दुसऱ्याच दिवशी एका स्टार खेळाडूच निधन झालं आहे. ब्रिटो असे या ब्राझिलियन फुटबॉलरचे नाव आहे. या घटनेने फुटबॉल विश्वात खळबळ माजली आहे.
 
brito 
 
fifa tournament  ब्राझीलच्या 1970 च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे बचावपटू ब्रिटो यांचे निधन झाले आहे. ते 86 वर्षांचे होते. ब्राझीलियन फुटबॉल फेडरेशनने त्यांच्या निधनाची घोषणा केली. परंतु मृत्यूच्या कारणाबद्दल तपशील दिला नाही. ब्रिटो यांनी 1964 ते 1972 दरम्यान ब्राझीलच्या संघासाठी 61सामने खेळले. ते 1966 विश्वचषक स्पर्धेतही संघाचा भाग होते, जिथे त्यांनी विल्सन पियाझा यांच्यासोबत एक मजबूत बचावफळी तयार केली होती.
 
fifa tournament  ब्राझीलियन फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष समीर योक्स म्हणाले, ‘ब्रिटो हे ब्राझीलियन फुटबॉलच्या इतिहासातील महान बचावपटूंपैकी एक होते. 1970 च्या विश्वचषकातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील. मी आपल्या देशाच्या या महान खेळाडूला आदरांजली वाहतो. त्यांची झुंजार वृत्ती आमच्या खेळाडूंना प्रेरणा देत राहील.‘
 
fifa tournament  ब्रिटो हे 1971 आणि 1972 मध्ये कोपा रोका व तासा इंडिपेंडेंसिया जिंकणाऱ्या ब्राझील संघाचाही भाग होते. ते इतिहासातील सर्वात प्रसिद्ध फुटबॉल संघांपैकी एकाचा भाग होते, ज्यात पेले, जारझिन्हो, टोस्टाओ, रिव्हलिनो आणि कार्लोस अल्बर्टो यांसारख्या सुप्रसिद्ध नावांचा समावेश होता.