आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत बी-बियाणे वाटप आज

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
वर्धा सोशल फोरमचा उपक्रम
 
वर्धा, 
free distribution of seeds वर्धा सोशल फोरम आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या संयुत वतीने जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांसाठी मान्सून भेट-२०२६ अंतर्गत मोफत बी-बियाणे वाटप कार्यक्रम व शेतकरी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन रविवार १४ रोजी सकाळी १० वाजता स्थानिक सत्यनारायण बजाज सार्वजनिक वाचनालयात करण्यात आले आहे.
 
 
seed
 
याच सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांसाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. प्रमुख अतिथी व उद्घाटक म्हणून परतवाडा येथील सुप्रसिद्ध समाजसेवक पद्मश्री शंकरबाबा पापडकर, अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिपच्या पंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानदा फणसे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अरविंद उपरीकर, उपविभागीय कृषी अधिकारी वैष्णवी शिंदे उपस्थित राहतील. कार्यक्रमाला नागरिक, जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे आणि सचिव अविनाश सातव यांनी केले आहे.