१७ पासून या राशींचे सुरू होणार ‘अच्छे दिन’

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
Good days' are about to begin for these zodiac signs. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात ग्रहस्थितीत महत्त्वपूर्ण बदल घडणार असून १५ जून रोजी सूर्य ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. याच राशीत आधीपासूनच बुध आणि चंद्र स्थित असल्याने या तिन्ही ग्रहांच्या एकत्रित संयोगातून “त्रिग्रही राजयोग” निर्माण होणार आहे. हा शुभ योग १७ जूनपर्यंत प्रभावी राहणार असून त्याचा परिणाम सर्व १२ राशींवर दिसून येणार आहे. मात्र काही राशींसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात वर्तवली जात आहे.
 
 

odiac signs 
 
मिथुन राशीत हा त्रिग्रही योग तयार होत असल्याने या राशीच्या जातकांसाठी हा काळ विशेष लाभदायक ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता असून त्यांच्या कामाचे कौतुक होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली आर्थिक कामे मार्गी लागू शकतात आणि प्रगतीची नवी दारे उघडू शकतात.
सिंह राशीसाठीही हा काळ सकारात्मक ठरणार आहे. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होण्याची शक्यता असून नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. घरातील वातावरण आनंदी राहील आणि अपेक्षित शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे.
कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हा योग करिअरमध्ये प्रगतीचा मार्ग खुला करणारा ठरणार आहे. नवीन प्रकल्प आणि ऑर्डर्स मिळण्याची शक्यता असून जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळू शकतो. मेहनतीचे योग्य फळ मिळण्याचा हा काळ मानला जात आहे.
तूळ राशीच्या लोकांसाठीही हा काळ भाग्यवृद्धी करणारा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असून प्रवासाचे योग निर्माण होऊ शकतात. मित्रांचे सहकार्य लाभदायक ठरेल आणि वैयक्तिक तसेच कौटुंबिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतात. ज्योतिषशास्त्रानुसार या त्रिग्रही योगामुळे जूनच्या मध्यात या राशींच्या जीवनात मोठे शुभ बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.