पुलगाव,
banana crop damage विरुळ सर्कलसह परिसरात यंदा प्रचंड उष्णतामानाने केळी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. झाडांची वाढ खुंटणे, पाने करपने, घडांची प्रतवारी घसरणे आणि उत्पादनात मोठी घट झाल्याने केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.
परिसरातील अनेक शेतकर्यांनी मोठ्या आशेने केळीची लागवड केली. पण, अतिउष्णतामानाने संपूर्ण पीक धोयात आले आहे. यामुळे शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक शेतकरी कर्जबाजारी असून उत्पादन नाममात्र आणि कर्जाचा डोंगर मोठा या विवंचनेत आहे. भविष्यात अशा नैसर्गिक आपत्ती, अतीउष्णता किंवा हवामान बदलामुळे होणार्या नुकसानीपासून शेतकर्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केळी पिकासाठी स्वतंत्र विमा योजना सुरू करावी, अशीही मागणी होत आहे.विरुळ सर्कलमधील केळी उत्पादकांच्या समस्याचीbanana crop damage माहिती आपण आ. सुमित वानखेडे यांना दिली आहे. नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देत हवालदिल केळी उत्पादकांना सरकारने दिलासा द्यावा, केळी पिकासाठी स्वतंत्र विमा योजना लागू करावी, अशी मागणी जिपचे माजी सदस्य गजानन निकम यांनी केली आहे.