कारंजात पालकमंत्र्यांच्या जनता दरबार व्हावा

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
कारंजा (घा.), 
'janata darbar' कारंजा तालुका आणि परिसरातील नागरिकांच्या विविध समस्या व मागण्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी कारंजा येथे जनता दरबाराचे आयोजन करावे, अशी मागणी तहसीलदार अनिल निनावे यांच्यामार्फत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याकडे निवेदनाद्वारे नागरी समितीसह विविध सामाजिक संघटना व नागरिकांनी केली आहे.
 
 
pankaj bhoyar
 
कारंजा (घा.) हा जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका असून वर्धेपासून कारंजा (घा.) लांब अंतरावर असल्याने सामान्य नागरिकांना पालकमंत्री डॉ. भोयर यांच्याकडे पोहोचणे शय होत नाही. या भागातील नागरिकांना प्रशासकीय अडचणी, पायाभूत सुविधा, शेती, रोजगार, जंगली जनावरे आणि आरोग्याशी संबंधित अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक पातळीवर प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी तालुयातील प्रशासकीय अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणीही निवेदनातून केली आहे.