संजय कपूर यांच्या आठवणीत करिश्मा भावूक

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |

 Sanjay Kapur
 
 
मुंबई,
Karisma Remembering Sanjay Kapur करिश्मा कपूरने तिचे माजी पती आणि उद्योगपती संजय कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त भावनिक श्रद्धांजली अर्पण केली आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका साध्या पण हृदयस्पर्शी संदेशातून तिने संजय कपूर यांची आठवण जागवली. करिश्माची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली असून अनेक चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनीही संजय कपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. गेल्या वर्षी त्यांच्या निधनाने कपूर कुटुंबासह व्यावसायिक क्षेत्रालाही मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्यानंतर कुटुंबीय आणि जवळच्या व्यक्ती अजूनही त्यांच्या आठवणींमध्ये रमलेले दिसतात. दरम्यान, संजय कपूर यांच्या पत्नी प्रिया सचदेव यांनीही सोशल मीडियावर भावनिक संदेश शेअर करत त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची आठवण करून दिली. आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणारे, मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणारे आणि प्रेमाने नाती जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांनी संजय कपूर यांचे वर्णन केले.