तभा ईफेट
मानोरा,
karkheda: Power line pole तालुयातील कारखेडा गावचे शेतकरी कृष्णकुमार गजानन सोळंके यांच्या शेतातील पडण्याच्या अवस्थेतील असलेले वीज वाहक खांब ज्याला तात्पुरते लाकूड लावून आधार देण्यात आला होता ज्याची बातमी प्रकाशित होताच महावितरण प्रशासनाला अखेर जाग येऊन या खांबाची डागडुजी करून खांब सरळ रोखण्यात आला आहे.
शेत सर्वे क्रमांक ३० मधील हे खांब खाली झुकले होते व पडण्याच्या अवस्थेत होते, ज्याचे वृत्त तालुयातील बहुतांश वृत्तपत्रांनी प्रकाशित केले होते. ज्याची दखल महावितरण प्रशासनाने घेऊन या लाकडी खांबाच्या आधाराने कसेबसे उभे असलेल्या खांबाला पावसापूर्वी ताठ मानेने उभे केले आहे, ज्यामुळे अपघाताचा धोका टळला असल्याची माहिती स्थानिक सामाजिक कार्यकर्ते प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.