गोविंद पोलाड यांच्या ‘जिंदाबाद’ कवितासंग्रहाचे प्रकाशन

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
नागपूर,
launch of govind polads poetry युवा कवी, सामाजिक विचारवंत आणि प्रख्यात व्याख्याते इंजि. गोविंद पोलाड यांच्या बहुचर्चित ‘जिंदाबाद’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा उद्या, रविवार (दि. १४ जून) रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. मराठा सेवा संघाच्या त्रिमूर्ती नगर येथील बळीराजा संशोधन केंद्रात होणाऱ्या या कार्यक्रमात प्रबोधन सम्राट सत्यपाल महाराज यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
 
launch of govind polads poetry
 
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या खंजरी परंपरेचे संवाहक, राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजिरी वादक इंजि. भाऊसाहेब थुटे राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानेश वाकुडकर, विचारवंत अनिलराव पोलाड, ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकरजी मेहकर आणि सामाजिक कार्यकर्ते जितेश राठोड उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान युवतींचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, प्रतीक्षा गुरनुले, कोमल म्हस्के आणि ॲड. अपूर्वा पिठ्ठलवार यांचा यामध्ये समावेश आहे.
 
मुख्य प्रकाशन सोहळ्यापूर्वी सकाळी १० वाजता ‘महाराष्ट्र युवा मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मच्छिंद्र सावळे राहणार असून, युवा प्राध्यापक जितेंद्र आसोले, प्रबोधनकार ज्ञानेश्वर रक्षक आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. याच निमित्ताने राष्ट्रीय प्रबोधनकार तथा सप्तखंजिरी वादक इंजि. पवनपाल दवंडे यांचे खंजिरीसह प्रबोधनपर कीर्तनही आयोजित करण्यात आले आहे.
 
समकालीन सामाजिक वास्तव, अन्यायाविरोधातील संघर्ष, परिवर्तनाची हाक आणि युवकांच्या भावना यांचे प्रभावी चित्रण करणारा ‘जिंदाबाद’ हा कवितासंग्रह साहित्यविश्वात चर्चेचा विषय ठरत आहे. त्यामुळे या प्रकाशन सोहळ्याबाबत साहित्यप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि युवकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. नागपूर व परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहून नव्या साहित्यकृतीचे स्वागत करावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र