गुरूंच्या पार्थिवासमोर ढसाढसा रडली मनू भाकर

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
देहरादून
jaspal rana भारतासाठी तब्बल 15 पदकं आणि 9 सुवर्णपदकं जिंकणाèया जसपाल राणा यांचे वयाच्या 49 व्या वर्षी निधन झाल. जसपाल राणा हे स्वत: देखील चांगले खेळाडू होते. तर त्यांनी अनेक खेळाडूंना प्रशिक्षण देखील दिलं आहे. यामध्ये मनू भाकरसह अनिश भानवालासारखे खेळाडू देखील आहेत. अशातच गुरूच्या निधनानंतर मनू भाकर हिला अश्रू अनावर झाले. जसपाल राणा यांचे पार्थिव देहरादून येथील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्यावेळी अनेक खेळाडूंनी हजेरी लावली.
 
 jaspal rana
jaspal rana  जसपाल राणा यांचे वडील नारायणसिंह राणा यांच्या शेजारी बसलेली मनु भाकर डोळे पुसताना दिसली. गुरुंच्या निधनाचा धक्का तिला सहन होत नव्हता. त्यावेळी ती नारायणसिंह राणा यांच्या गळ्यात पडून देखील रडली. पॅरिस ऑलिम्पिक जसपाल राणा यांनी मनू भाकरसाठी कठीण परिश्रम घेतले होते. त्याचाच परिणाम म्हणून भारताला कांस्यपदक मिळाले होते. त्यानंतर अनेक कामगिरींमध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे.
jaspal rana  गुरू जसपाल राणा यांच्या निधनावर मनू भाकरने दोन शब्दात ट्विट केलं. ‘अपूर्णनीय हानी’ असे म्हणत तिने सोशल मीडियावर गुरू राणा यांच्यासोबतचे तीन फोटो शेअर केले आहेत. दरम्यान, मनू भाकरच्या करिअरमध्ये जसपाल राणा यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. अशातच आता गुरूच्या निधनानंतर मनूला प्रशिक्षण कोण देणार, असा सवाल विचारला जात आहे.