समुद्रपूर,
mohgaon gram panchayat आगामी ग्रापं सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने तहसीलदार कपिल हाटकर यांच्या सुचनेनुसार मोहगाव ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेत वार्ड निहाय आरक्षण सोडतीसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजित करण्यात आले होते.
अध्यक्षस्थानी अध्यासी अध्यक्ष आर. पि. धनविजय तर ग्रामपंचायत प्रशासन विलास नवघरे, ग्रामसेवक अखिलेश ढोबळे, तलाठी प्रदीप अरगडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी धनविजय यांनी प्राधान्य क्रमाने लॉट पद्धतीने निच्छित केल्या प्रमाणे वार्ड १ करिता अनुसूचित जमातीकरिता १ व सर्वसाधारण स्त्रीकरिता २ जागा, वार्ड अनुसूचित जातीसाठी १ अनुसूचित जमातीसाठी १ सर्वसाधारण स्त्रीकरिता १ तर वार्ड ३ करिता अनुसूचित जमाती स्त्रीकरिता १ सर्वसाधारण स्त्रीकरिता १ आणि सर्वसाधारणकरिता अशा ३ वार्डासाठी ९ जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी प्रशासन विलास नवघरे, ग्रामसेवक अखिलेश ढोबळे, तलाठी प्रदीप अरगडे यांनी आरक्षण संबंधी समस्या जाणून घेतल्या.