एकाचा मृत्यू तिघे जखमी
नेर,
Ner Accident तालुक्यातील दोडकीनजीक दोन चारचाकी वाहनाची समोरासमोर धडक होऊन यात एकजण ठार तर तीन जखमी झाल्याची घटना शुक्रवारी घडली. नेर येथून नांदगावकडे मालवाहू वाहन क्र. एमएच27 एक्स8453 जात होते. अमरावतीवरून नेरकडे मिनी खाजगी प्रवासी बस क्र. एमएच09 बीए5587 येत होती. दरम्यान, दोन्ही वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली.
यात बसमधील विक्रम राम चितोडिया (वय 27, चिखलसावंगी, ता. मोर्शी, जि. अमरावती) यांचा जागीच मृत्यू झाला. दोन्ही वाहनातील तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली. ही माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनेचा अधिक तपास ठाणेदार अनिल बेहराणी करत आहेत.