रेणुकाला डच्चू, अरुंधतीला संधी?

महिला विश्वचषकासाठी नवा फॉर्म्युला

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
नवी दिल्ली,
New formula for Women's World Cup आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2026 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील बहुप्रतीक्षित लढतीकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघ कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध मैदानात उतरणार असून, या सामन्यासाठी अंतिम संघरचना कशी असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कर्णधार हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. मात्र, अंतिम अकरा खेळाडूंची निवड करताना संघ व्यवस्थापनासमोर काही महत्त्वाचे निर्णय असणार आहेत. माजी क्रिकेटपटू अभिषेक नायरने या सामन्यासाठी आपली संभाव्य भारतीय प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे.
 
 
 
Women
 
त्यांच्या मते, सलामीला शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना ही जोडी कायम ठेवली पाहिजे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांनी यास्तिका भाटिया हिची निवड केली आहे. त्यानंतर जेमिमा रॉड्रिग्स आणि हरमनप्रीत कौर मधल्या फळीत महत्त्वाची भूमिका बजावतील, असे मत त्यांनी व्यक्त केले. खालच्या फळीत आक्रमक फलंदाजीसाठी रिचा घोष आणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. तसेच, संघाला अतिरिक्त फिरकीचा पर्याय मिळावा यासाठी राधा यादवहिला पसंती देण्यात आली आहे.
 
 
संभाव्य संघात सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे वेगवान गोलंदाज रेणुका सिंगला संघात स्थान न देण्याचा निर्णय. जगी अरुंधती रेड्डी, श्री चरणी आणि क्रांती गौड यांच्यावर मोठा विश्वास आहे. सध्याचे स्वरूप पाहता गोलंदाजी विभाग अधिक प्रभावी ठरू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले आहे. भारताच्या यशासाठी काही खेळाडू निर्णायक ठरतील, असेही सांगण्यात आले आहे. नवीन चेंडूवर स्विंगचा फायदा घेत क्रांती गौड प्रतिस्पर्धी संघाला सुरुवातीलाच धक्का देऊ शकते, तर श्री चरणी फिरकी गोलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. फलंदाजीत शेफाली वर्माचा आक्रमक खेळ भारताला वेगवान सुरुवात करून देऊ शकतो.