शेतकऱ्यांना मिळणार कॅनमध्ये डिझेल

४० लिटरची मर्यादा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
भंडारा
diesel ग्रामीण भागातील शेतकरी ट्रॅक्टरधारकांना शेतीच्या कामासाठी डिझेल खरेदी करताना ५ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पेट्रोल पंपापर्यंत ट्रॅक्टर घेऊन जावे लागत असल्याने अतिरिक्त डिझेल खर्च आणि आर्थिक भार सहन करावा लागत आहे. या समस्येवर उपाय म्हणून शेतकèयांना पेट्रोल पंपांवरून कॅन डिझेल उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी सावनकुार यांनी आदेश निर्गमीत केले आहेत.
 
 

Sawan Kumar, farmers diesel in cans scheme, Bhandara diesel order farmers,
जिल्ह्यात पेट्रोल-डिझेल विक्री बाबद तुटवडा निर्माण होत असल्याच्या अफवा समाजमाध्यमांवर पसरत असून त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची तसेच ज्वलनशील पदार्थांच्या मुक्त विक्रीमुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहेत.
 
 
या अंतर्गत पेट्रोलियम नियम, २००२ मधील तरतुदींचा विचार करून शेतकऱ्यांना शेती कामासाठी लागणारे डिझेल प्लॉस्टिकच्या बाटली किंवा कॅनमध्ये देण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा उतारा किंवा आधारकार्ड यापैकी ओळखपत्र सादर करणे आवश्यक राहील. एका शेतकèयाला एका दिवसात जास्तीत जास्त ४० लिटर डिझेल पेट्रोल पंपावरून देण्यात येणार आहे,diesel  असे लेखी आदेश जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी निर्गमित केले आहे.
 
 
पेट्रोल पंपांवर होणारी गर्दी आणि संभाव्य diesel  वाद टाळण्यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने पंप परिसरात नियमित गस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पंप चालकांनी आपल्या परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवणे आणि शेतकèयांना विक्री करण्यात आलेल्या डिझेलची नियमित नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.सदर आदेश सार्वजनिक हिताच्या दृष्टीने जारी करण्यात आला असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.