मुंबई
school bus and van fees नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याबरोबर पालकांना महागाईचा आणखी एक फटका बसला आहे. जून अखेरीस सुरू होणाèया शाळांसाठी बस आणि व्हॅनच्या शुल्कात १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. संपूर्ण राज्यभरात ही दरवाढ लागू असणार आहे.
school bus and van fees इंधन दरवाढ, वाहन देखभाल खर्च, विमा, टोल आणि चालक-कर्मचाèयांच्या वाढलेल्या वेतनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे बस आणि व्हॅनमालक संघटनेकडून सांगण्यात आले आहे. पालकांवरील भार टाळण्यासाठी राज्य सरकार, परिवहन मंत्रालय आणि अंमलबजावणी प्राधिकरणांकडे सहायक यंत्रणा आणि पर्यायी उपायांची विनंती करणारी अनेक निवेदने शालेय वाहन चालक-मालक संघटनेकडून सादर करण्यात आली होती. कारण या दरवाढीने पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा बोझा वाढणार आहे. मात्र, प्रशासनाकडून कोणताही ठोस प्रतिसाद किंवा सुधारणात्मक कारवाई न झाल्याचे संघटनेने सांगितले. कोणताही दिलासादायक उपाय न मिळाल्याने अखेर दरवाढीचा निर्णय घेण्यात आला.
school bus and van fees त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी शालेय बस वाहतूक शुल्कात जून 2026 पासून 15 टक्के वाढ करण्यात आली आहे.