स्वरनाद सुर संग्राम २०२६चा ग्रँड फिनाले उत्साहात

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
नागपूर,
swarnad sur sangram 2026 ‘कॉस्मिक कल्चरल इव्हेंट्स, नागपूर’ यांच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गायन स्पर्धा ‘स्वरनाद सुर संग्राम २०२६’ चा भव्य ग्रँड फिनाले उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. संगीतप्रेमींच्या मोठ्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात स्पर्धकांनी आपल्या सुरेल सादरीकरणातून रसिकांची मने जिंकली. या स्पर्धेत आशीष कैथवास यांनी उत्कृष्ट गायन कौशल्य सादर करत विजेतेपद पटकावले. निकिता वासनिक यांनी प्रथम उपविजेतेपद, तर पलक वानखेडे यांनी द्वितीय उपविजेतेपद मिळविले. सांत्वन पुरस्कार अनघा लोनारे, डॉर्फी जनबंधू, तनिष गजभिये, सचिन शिवपुरे आणि सतीश दामोदरे यांना प्रदान करण्यात आले.
 
 
swarnad sur sangram 2026
 
कार्यक्रमाचे अध्यक्ष व आयोजक सारिका खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पजाई, डॉ. रश्मी तिरपुडे, पूजा ठाकूर राजोरिया, वृंदा ठाकरे, शैलेश शिरभाते, रेणुका काटे तसेच झाडे उपस्थित होते. मान्यवरांनी स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. swarnad sur sangram 2026 या कार्यक्रमात MY FM चे आरजे देखील उपस्थित होते, ज्यांनी स्पर्धकांचे मनोबल वाढवले तसेच आयोजकांचे यशस्वी आयोजनाबद्दल अभिनंदन केले. स्पर्धेचे परीक्षण सुप्रसिद्ध परीक्षक तेजस्विनी खोडतकर आणि कृती बक्सी यांनी केले. त्यांनी सूर, ताल, उच्चार, सादरीकरण आणि एकूण कलात्मकतेच्या आधारे निष्पक्ष निकाल जाहीर केला.
 
ग्रँड फिनालेदरम्यान राहुल तुमसरे, स्वाती थोरात, रजनी गेडाम आणि राजेश झाडे यांनी सादर केलेल्या मेडली परफॉर्मन्सने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. त्यांच्या सुमधुर सादरीकरणाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. swarnad sur sangram 2026 कार्यक्रमाचे संचालन संगीता तांबोळी यांनी केले, तर संपूर्ण ध्वनी व्यवस्था स्वरनाद म्युझिकल स्टुडिओ यांच्या माध्यमातून सांभाळण्यात आली. साऊंड इंजिनिअर रुचिर झाडे यांनी उत्कृष्ट ध्वनी संयोजनाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली.
 
समारोप प्रसंगी आयोजक सारिका खडसे यांनी सर्व स्पर्धक, परीक्षक, प्रमुख पाहुणे, सहकारी आणि उपस्थित रसिकांचे आभार मानले. नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी भविष्यातही अशा दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. swarnad sur sangram 2026 राज्यभरातील गुणी गायक-गायिकांना एकत्र आणणारा ‘स्वरनाद सुर संग्राम २०२६’ हा कार्यक्रम नागपूरच्या सांस्कृतिक विश्वात ठसा उमटवणारा आणि संगीतप्रेमींसाठी अविस्मरणीय ठरला.

सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र