डोनाल्ड ट्रम्प यांचा जगाला सुखद धक्का

    दिनांक :13-Jun-2026
Total Views |
पुढच्या 24 तासांत होणार इराणसोबत युद्ध समाप्तीची घोषणा ?
 
इस्लामाबाद : 
US-Iran War अमेरिका आणि इराणमध्ये जरी युद्धविरामाची घोषणा झाली असली तरी देखील अजूनही संघर्ष सुरूच आहे. तीन दिवसांपूर्वी इराणकडून अमेरिकेच्या तब्बल 22 सैन्य तळांवर मिसाईल आणि ड्रोनने भीषण हल्ले करण्यात आले होते. ज्यामध्ये अमेरिकेच्या जॉर्डनमधील सैन्य तळाचा देखील समावेश होता. त्यानंतर अमेरिकेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं. दरम्यान जोपर्यंत इराण अणु करार करणार नाही, तोपर्यंत हे युद्ध पूर्णपणे थांबणं अशक्य असल्याचं आधीच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आम्ही इराणला कोणत्याही परिस्थितीमध्ये कधीही अणुबॉम्ब बनवू देणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र आता मध्यपूर्वेतून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे पुढच्या 24 तासांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये एक मोठी डील होणार असून, त्यानंतर युद्ध कायम स्वरुपी थांबण्याची शक्यता आहे. याबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी दावा केला आहे.
 
 
tramp
 
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराणमधील डील संदर्भात मोठा दावा केला आहे. अमेरिका आणि इराणमध्ये युद्धविरामाच्या प्रस्तावावर एकमत झालं आहे. पुढील 24 तासांमध्ये अमेरिका आणि इराणकडून एका मोठ्या डीलवर हस्ताक्षर होणार आहेत. पाकिस्तानकडून या प्रस्तावावर डिजिटल स्वरुपात सही करण्याची तयारी सुरू आहे, त्यानंतर युद्ध समाप्तीची घोषणा होऊ शकते, असा दावा शरीफ यांनी केला आहे. दरम्यान यावेळी बोलताना हा करार पाकिस्तानच्याच मध्यस्थीने होत आहे, असा देखील दावा शरीफ यांनी केला आहे. परंतु अमेरिका आणि इराणने आतापर्यंत या करारासंदर्भात कुठेही पाकिस्तानचं नाव घेतलेलं नाहीये. शरीफ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आता आम्ही युद्धविरामाच्या खूप जवळ पोहोचलो आहोत. पुढील 24 तासांमध्ये अमेरिका आणि इराणमध्ये एक मोठी डील होणार आहे, दोन्ही देशांकडून शांततेच्या प्रस्तावावर आणि अटींवर एक मत झालं आहे. आम्ही त्यासाठी तयारी देखील सुरू केली आहे, असा दावा शरीफ यांनी केला आहे.